वक्फ सुधारणा विधेयकाची नेमकी व्याख्या काय आहे?

02 Apr 2025 12:45:36

definition of the waqf amendment bill 
The Waqf Amendment Bill, 2024 : वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४ आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक, २०२४ ही दोन विधेयके ८ ऑगस्ट, २०२४ रोजी लोकसभेत सादर करण्यात आले होते. या विधेयकाचे उद्दिष्ट वक्फ बोर्डाचे काम सुव्यवस्थित करणे आणि वक्फ मालमत्तेचे कार्यक्षम व्यवस्थापन सुनिश्चित करणे आहे.
 
वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४ चे उद्दिष्ट वक्फ कायदा, १९९५ मध्ये सुधारणा करणे आहे, जेणेकरून वक्फ मालमत्तेचे नियमन आणि व्यवस्थापन करताना येणाऱ्या समस्या आणि आव्हाने यांवर उपाययोजना करता येतील. देशातील वक्फ मालमत्तेचे प्रशासन आणि व्यवस्थापन सुधारणे हे या दुरुस्ती विधेयकाचे उद्दिष्ट आहे.
 
वक्फ सुधारणा विधेयकाचे मुख्य उद्देश :
  • पूर्वीच्या कायद्यातील उणिवा दूर करणे आणि वक्फ बोर्डाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करून कायद्याच्या नावात बदल करणे.
 
  • वक्फच्या व्याख्या अद्ययावत करणे
 
  • नोंदणी प्रक्रियेत सुधारणा
 
  • वक्फ रेकॉर्डच्या व्यवस्थापनात तंत्रज्ञानाची वाढती भूमिका
 
Powered By Sangraha 9.0