नवी दिल्ली (Waqf Amendment Bill) : संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यात केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री किरेन रिजीजू यांनी वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले. या विधेयकावर सध्या सभागृहात चर्चा सुरू आहे. विधेयक सादर केल्यानंतर विधेयकावर चर्चेसाठी ८ तासांचा वेळ देण्यात आला आहे. या विधेयकावर चर्चा करताना राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी शरद पवार गटाची भूमिका मांडली आहे.
वक्फ विधेयकावर निलेश लंकेंनी वाचली शरद पवारांची स्क्रिप्ट
वक्फ विधेयकामुळे हिंदूंना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, सत्य नाकारून आता विरोधी पक्षांतून वक्फ विधेयकाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. निलेश लंके म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सशक्तीकरणाच्या नावाखाली वक्फ बोऱ्डाला कमकुवत करण्याचा धोका आहे, असे निलेश लंके म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, आपण सत्तेत आलो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले होते. त्यानंतर आपण जसे सत्तेत आलो तसे आपण त्यांचे विचार सोडले होते. शिवाजी महाराज हे केवळ तलवार चालवणारे योद्धे नव्हते तर त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन धर्मांना सोबत घेऊन जाणारे असल्याचे वक्तव्य निलेश लंके यांनी केले आहे.
अशातच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक कविता सादर केली, शिवरायांचा विचार... सर्वधर्मांना मान दिला सर्वांना सन्मान दिला, जातीपातीचा भेद नको साऱ्यांना एकच वेद न्याय करुया धैर्य अपार, असा होता शिवरायांचा विचार,या संबंधित विधेयकामध्ये वक्फव बोर्डाला सशक्त करण्याच्या नावाखाली त्याची जमीन हडपवण्याचा डाव दिसतो, त्यामुळे मला काही सूचना करण्याची आवश्यकता वाटते, अशी मागणी निलेश लंके यांनी केली होती.
दरम्यान, वक्फचे अधिकार कमी न करता त्यात बदल करावे आणि त्यात सुसूत्रता आणण्याचे काम केंद्राने करावे. सशक्तीकरणाच्या नावाखाली संस्थेने अधिकार कोणीही हिरावून घेऊन वक्फ बोर्डाचे अधिकार कमी न करता त्यात योग्य बदल करुन सुसूत्रता आणाण्याचे काम केंद्राने करावे. सशक्तीकरणाच्या नावाखाली संस्थेचे अधिकार कोणीही हिरावून घेऊ नये. संबंधित अल्पसंख्याकांच्या भावना लक्षात घेत वक्फ बोर्डात संबंधित प्रतिनिधी असावेत. मुस्लीम, पारसी, ख्रिश्चन, जैन, अशा अल्पसंख्यांक समाजाला राष्ट्रीय समाज उभारणीचे भागीदार आहेत, अशी मागणी करण्यात आली.