मुंबई : उबाठा गट काँग्रेसच्या पाठिंब्यावरचे बांडगुळ झाला असून ‘हिरवी कावीळ' झालेल्यांना वक्फ बोर्ड आणि हिंदुत्वाचा संबंध नाही असे वाटणे साहाजिक आहे, असे प्रत्युत्तर भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवार, २ मार्च रोजी संजय राऊत यांना दिले.
संजय राऊत यांनी वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही, अशी पोस्ट आपल्या 'एक्स' अकाऊंटवर केली होती. यावर उत्तर देताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, " हिरवी कावीळ झालेल्या ज्या नव्या दिव्य दृष्टीतून तुम्ही बघता त्यातून तुम्हाला वक्फ बोर्ड आणि हिंदुत्वाचा संबंध नाही, असे वाटणे साहजिकच आहे. पण वक्फ बोर्डाची हिंदूंच्या विरोधातील मनमानी खरंच जाणून घ्यायची इच्छा असेल तर देशभरातील हिंदू मंदिरे आणि ज्या सर्वसामान्य हिंदूंची घरे वक्फ बोर्डाने बळकावली आहेत त्यांना विचारा. ते 'वक्फग्रस्त' हिंदू ज्या शोकांतिका सांगतील, त्या ऐकून तरी तुमच्या मनाला पाझर फुटेल अशी आशा आहे.
हे वाचलंत का? - औरंगजेब इथे गाडला गेला! छत्रपती संभाजीनगरमध्ये झळकले मनसेचे बॅनर
मालकीणबाईंच्या सासूबाईंचे कोडकौतुक सुरू राहू दे
ते पुढे म्हणाले की, "तुमचा पक्ष काँग्रेसच्या पाठिंब्यावरचे बांडगुळ झाला आहे. तेव्हा 'मालकीणबाईं'च्या सासूबाईंचे कोडकौतुक सुरू राहू देत," अशी खोचक टीकाही रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.