नवी दिल्ली (Woqf Board) : संसदेत २ एप्रिल २०२५ रोजी मांडलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध होत आहे. केंद्रीय पातळीवर राज्य पातळीवर विरोधी बाकांवर बसणाऱ्या नेते मंडळींनी विधेयकाला टोकाचा विरोध केला आहे. राज्यातही या विधेयकावरून विरोधकांकडून केंद्र सरकार भाजपवर लक्ष केंद्रीत करत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्त्वाचा काहीही एक संबंध नसल्याची गरळ ओकली आहे. त्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर टीकेची तोफ डागली आहे.
एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यावेळी त्यांनी राऊत यांनी केलेल्या विधानावरही भाष्य केले आहे. वक्फ बोर्डाच्या संदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही आमच्या सोईसाठी कधीही राजकारण केलेलं नाही, वक्फचा आणि हिंदुत्ववाचा संबंध नाही असे म्हणणारे राजकारण करतात, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना जबरदस्त चपराक लगावली आहे.
"आमची भूमिका खुलेआम"
त्यानंतर पुढे बोलत असताना त्यांनी आम्ही जी भूमिका घेतो ती भूमिका खुलेआम असते, असे ते म्हणाले होते. यावेळी संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरही भाष्य करण्यात आले. वक्फ बोर्डाच्या संदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात आली. आम्ही सोईचं राजकारण कधीही केलेलं नाही. सोईचं राजकारण करणारे लोक वक्फचा हिंदुत्वाशी संबंध नसल्याचे म्हणतात. म्हणूनच त्यांच्या भूमिकांवर संशय निर्माण होत आहे. आमची भूमिका खुलेआम असते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या विचारानेच आम्ही सर्व निर्णय खुलेआम घेतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वक्फच्या मालमत्तेवर भाष्य करण्यात आले.
"आम्ही दुटप्पी भूमिका घेत नाही"
आम्ही दुटप्पी भूमिका घेत नसून सडेतोड आणि सामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेण्यात आली. वक्फ बोर्डाची संपत्ती सामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेतली आहे. वक्फ संपत्ती मुठभर लोकांच्या हातात ठेवण्यापेक्षा समजातील लोकांच्या हातात ठेवण्यापेक्षा समाजातील बहुसंख्य लोकांना संपत्तीची सुविधा मिळणे आवश्यक आहे. वक्फवर कोणाचेही नियंत्रण नसून मुस्लिम महिलांनाही या वक्फ विधेयकाचा फायदा होणार आहे. अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे.