मुंबई : देशभरात सध्या वक्फ सुधारणा विधेयकाची चर्चा आहे. यावरून सध्या राजकीय गदारोळ सुरु असतानाच उद्धव ठाकरे वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान करणार की, विरोधात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे.
हे वाचलंत का? - वक्फ सुधारणा विधेयक संसदेत पटलावर ठेवण्याची प्रक्रिया काय होती? जाणून घ्या...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "वक्फ सुधारणा विधेयक संसदेत येणार आहे. बघूया उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की, राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?" असे ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले. दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकाबाबत उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.