भोपाळमधील सरकारी विभागातील निवासी संकुलात २ कबरींचे अवैध बांधकाम, लँड जिहाद विरोधात उठवला आवाज
19-Apr-2025
Total Views | 17
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील व्हीव्हीआयपी परिसरात सरकारी निवासस्थानी दोन कबरींचे बांधकाम करण्यात आले होते. महत्त्वाची बाब अशी की, ही जागा माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि तमाम आयएएस ते सरकारी निवासस्थानांपासून फक्त १ किमी अंतरावर आहे. मात्र, संबंधित प्रकरणाची माहिती अद्यापही कोणत्याच अधिकाऱ्याला देण्यात आली नव्हती. हे प्रकरण समोर आल्यानंतर हिंदू संघटनांनी संबंधित प्रकरणास 'लँड जिहाद' असे नाव दिले आहे.
प्रसारमाध्यमाच्या अहवालानुसार, १२५० कार्टर विभागात ९० % टक्के निवासस्थाने सरकारी आहेत. अशातच एका घराच्या परिसरात कबरींमुळे हिंदू संघटनांमध्ये संताप वाढला.
संस्कृती बचाओ मंच, नावाच्या संघटनेचा दावा आहे की, संबंधित कबर ही नुकतीच बनवण्यात आली होती. संघटनांच्या अधिकाऱ्यांनी पत्र लिहून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी पुढे लिहिले की, बाघम्बरी मंदिरानजीक मुस्लिम व्यक्तींना दोन कबरी बेकायदेशीरपणे बांधल्या आहेत.यासाठी योग्य ती दंडात्मक कारवाई केली जावी, ज्यामुळे शासनाच्या बहुमूल्य भूमीला अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्थानिक लोकांनी दावा केला की, संबंधित कबरी या पूरातनकालीन आहेत असे सांगितले होते, या कबरी मुस्लिम कुटुंबियांनी बांधल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच प्रशासनाने सांगितले की, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.