ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर रोहित पवारांचं सूचक ट्विट, म्हणाले, केवळ ठाकरे...
19-Apr-2025
Total Views |
मुंबई : राज्यभरात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. यातच आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी याबद्दल एक सूचक ट्विट केले आहे.
रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, "मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवे आणि यातच महाराष्ट्राचे हीत आहे," असे ते म्हणाले.
एका मुलाखतीत बोलताना राज ठाकरेंनी उबाठा गटाशी यूती करण्याबाबत सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही काही अटी ठेवत मनसेसोबत जाण्याची तयारी दाखवली होती. यामुळे सध्या ठाकरे बंधू एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.