JEE Main 2025 Toppers List : नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएचा जेईई मेन्स सेशन-२ चा निकाल शनिवार दि. १९ एप्रिल रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत देशभरातून एकूण २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. या यादीत महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे ज्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.
महाराष्ट्रातील आयुष रवि चौधरी, सानिध्य सराफ आणि विशाद जैन हे तिघेही १०० पैकी १०० टक्के गुण मिळवत परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक ७ विद्यार्थी राजस्थानचे आहेत. तर महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तरप्रदेशमधील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांचा समावेश या यादीत आहे. पश्चिम बंगाल, दिल्ली, गुजरात येथील प्रत्येकी दोन तर आंध्रप्रदेश, कर्नाटक येथील प्रत्येकी एक विद्यार्थींचा समावेश आहे.
परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी:
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\