नरेंद्र मोदींना भेटणं म्हणजे भाग्यच! एलन मस्कने सोशल मीडियावर ट्विट करत दिली माहिती

    19-Apr-2025
Total Views |

Elon Musk And Narendra Modi
 
वॉशिंग्टन : टेस्ला आणि स्पेस एक्स या कंपनीचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी एका वर्षात भारतात येण्याचा दावा केला आहे. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी नरेंद्र मोदींना भेटणं म्हणजे माझे भाग्यच असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. त्यांनी आपण याआधी नरेंद्र मोदींसोबत टेलीफोनद्वारे संपर्क केला असल्याच्या आठवणीला उजाळा दिला असल्याचे सांगितले आहे.
 
याआधी नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र मोदी यांनी १८ एप्रिल रोजी एक्स ट्विटरवर मस्कसोबत फोनद्वारे संपर्क केला आणि चर्चा केल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, एलन मस्क यांच्याशी बोलताना विभिन्न मुद्याला घेऊन चर्चा करण्यात आली की, वर्षाची सुरूवात ही वॉशिंग्टन डीसीमध्ये आमच्या बैठकीदरम्यान अनेक विषय समाविष्ट करण्यात आले. आम्ही तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात सहकार्याच्या अफाट क्षमतेवर चर्चा केली.
 
 
 
नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतातील या क्षेत्रात अमेरिकेसोबत मैत्री नातेसंबंध प्रस्थापित करत या नाते टिकवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. सांगण्यात येत आहे की, डोनाल्ड ट्रम्प सरकारने सरकारी दक्षता विभागाचे प्रमुख असणारे एलन मस्क यांनी नरेंद्र मोदींसोबत संपर्क केला. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स २१ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत. मस्क यांनीही इलेक्ट्रिक वाहन भारतात लॉन्च करण्याची तयारी दाखवली.