अमृतपाल सिंह यांच्यावर एनएसए लावण्याचा भगवंत मान सरकारने घेतला निर्णय

    19-Apr-2025
Total Views | 9

अमृतपाल सिंह
चंदीगड : पंजाबमधील खदूर साहिब येथील खलिस्तान समर्थक खासदार अमृतपाल सिंह यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू होणार आहे. अशा परिस्थितीत आणखी एक वर्ष तुरूंगातून बाहेर येऊ शकणार नाही. अमृतपाल सिंह यांच्यावर आणखी एक वर्षांसाठी एनएसए लावण्याचा निर्णय पंजाब आपचे मुख्यमंत्री भगवंत मान सरकारने घेतला आहे.
प्रसारमाध्याने दिलेल्या अहवालानुसार, पंजाब सरकारने अजूनही अमृतपाल सिंह यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका मानले गेल्याचे बोलले जात आहे. खासदार अमृतपास सिंग सध्या आसमच्या दिब्रुगड तुरुंगात आहेत. त्याला २०२३ मध्ये पंजाबमधून अटक करण्यात आली होती. पंजाबमधील अंजनाला पोलीस ठाण्यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.
अमृतपाल सिंह यांनी अलीकडेच स्वत:चा पक्ष स्थापन केला जो सध्या त्यांचे सहकारी आणि कुटुंबातील सदस्य चालवत आहेत. पंजाब सरकारने अमृतपाल सिंहवर इतर आरोपींविरोधात एनएसएची कारवाई न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खासदार अमृतपाल यांच्यावरही एका खून प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121