मुलूंड पोलिस ठाण्याबाहेर किरीट सोमय्यांचे ठिय्या आंदोलन!
18-Apr-2025
Total Views | 25
मुंबई : मुलूंड पोलिस ठाण्याबाहेर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. अनधिकृत मशीदी आणि त्यावरील भोंग्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवार, १८ एप्रिल रोजी किरीट सोमय्या यांनी आंदोलन पुकारले आहे.
किरीट सोमय्या यांनी मुलूंड पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतू, या आंदोलनास परवानगी देत नसल्याचे पत्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सोमय्यांना दिले होते. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असून ट्राफिक जाम होवुन वाहतुक कोलमडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या आंदोलनास मनाई करण्यात आली होती.
त्यानंतर मुलूंड परिसरात असलेले अनधिकृत मशीद आणि भोंग्यांविरोधात किरीट सोमय्यांनी आंदोलन छेडले आहे. आमदार मिहीर कोटेचादेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अनधिकृत मशीद आणि भोंग्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.