पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

    17-Apr-2025
Total Views |

Mamata Banerjee
 
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी भारताच्या संविधानाचा दाखले देत आपण संविधानाहून मोठ्या आहात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते एका प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे.
 
मिथून चक्रवर्ती म्हणाले की, भाजपच नव्हे तर आता ममता बॅनर्जी राज्यातील जातीय हिंसाचारा पूर्वनियोजित असल्याचे म्हणाल्या होत्या. समाजामध्ये उभी फूट पाडण्याचे काम करत आहेत. बंगाली हिंदू परिस्थितीनुसार, पलायन करत आहेत आणि जे मिळेल ते खात आहेत. त्यांचा यामध्ये दोष कसला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील झालेला हिंसाचार हा नियोजित असल्याचा दावा केला होता आणि त्यानंतर मिथून चक्रवर्ती यांनी भाष्य केले होते. हे सर्व बीएसएफ, केंद्रीय एजन्सी आणि भाजपचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. त्यांच्यामुळेच बांगलादेशातून घुसखोरी करणे सोपे झाले, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.
 
त्यानंतर आता मिथून चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी यांनी केलेलं विधान हे जाणूनबुजून करण्यात येत असल्याचे बोलण्यात आले. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांना वक्फ सुधारित कायद्याच्या मुद्द्यावरून प्रश्न केला की, तुम्हाला वक्फ कायदा लागू न करण्याचा अधिकार ममता बॅनर्जींनी कोणी दिला? त्या एक मुख्यमंत्री आहेत. संविधानावर बोलू नये. लक्षात घेण्यासारखे असे की, मार्च- एप्रिल २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, जिथे २९४ जागांसाठी निवडणुका होतील आणि यामुळेच आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप वक्फ कायदा, जातीय हिंसाचार आणि प्रशासनाच्या मुद्यावरून ममता सरकारला घेण्यात आले आहे.