दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री दुर्गेश पाठक यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा
17-Apr-2025
Total Views |
नवी दिल्ली : आप नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री दुर्गेश पाठक (Durgesh Pathak) यांच्या निवासस्थानी सकाळी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) छापा टाकला आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस संदीप पाठक यांनी सोशल मीडियावरील एक्स पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. हा छापा राजकीयदृष्ट्या एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
गुजरात निवडणूक २०२७ साठी सह-प्रभागी म्हणून नियुक्त झाल्यानंतर काही दिवसांत नेते दुर्गेश पाठक यांच्या निवासस्थानी सकाळी सीबीआयने टाकलेला छापा हा एक संदेश आहे. त्यानंतर भाजप स्पष्टपणे आपला गुजरातमधील वाढता धोका लक्षात घेता ते हैराण झाले आहेत, असे संदीप पाठक यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. पुढे अधिकाऱ्यांनी सांगितले की, एजन्सीने त्यांच्याविरूद्ध परकीय योगदान नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.
The CBI’s raid on @AamAadmiParty leader Durgesh Pathak’s residence this morning- just days after he was named co-incharge for Gujarat elections 2027-sends a loud message that BJP clearly views AAP as a growing threat in Gujarat and is rattled by its rising influence.
संबंधित प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर आम आदमी पक्षाला नष्ट करण्यासाठी सर्व युक्त्या वापरल्याची निरर्थक टीका केली आहे.
भाजपने पुन्हा सीबीआयचा खेळ सुरू केला आहे. सीबीआय गुजरातच्या सह-प्रभारी दुर्गेश पाठक यांच्या घरी दाखल झाले होते. गुजरातमध्ये भाजपची अवस्था वाईट आहे. दुर्गेश पाठकला गुजरातचा सह-प्रभारी बनवताच धमकावण्यासाठी सीबीआय पाठवण्यात आली, असे राज्यसभा खासदाराने एक्स सोशल मीडियावर सांगितले आहे.
मंगळवारी, ईडीने ४८ हजार कोटी रुपयांच्या पर्ल अँग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून आपचे आमदार कुलवंत सिंग यांच्या मोहालीतील निवासस्थानी छापा टाकण्यात आला.
दिल्लीतील ईडी अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जनता लँड प्रमोटर्स लिमिटेड परिसरात सिंग यांच्या घरावर छापा टाकला. जो त्यांच्या रिअर इस्टेट व्यवसाय करण्याशी संबंधित आहे. सिंग त्या ठिकाणी नव्हते, तरी कारवाईदरम्यान त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी करण्यात आली.