वक्फ सुधारित कायद्यामुळे केरळातील नागरिकांच्या संघर्षाचा शेवट होणार, किरेन रिजिजूंचे प्रतिपादन

    16-Apr-2025
Total Views | 25

Waqf Amendment Act
कोची : देशात नुकताच वक्फ कायदा (Waqf Amendment Act) संसदेत पारित करण्यात आला आहे. याचा फायदा गरीब मुस्लिम आणि महिलांनाही होणार आहे. अशातच आता केरळातील मुनंबममध्ये मंगळवारी १५ एप्रिल २०२५ रोजी भाजपद्वारे थॅक्यू मोदी या नावाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उद्घाटनाआधी केरळातील कोच्चीमध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुनंबमधील लोकांना आश्वासन दिले की, वक्फ कायद्यामुळे लोकांच्या संघर्षातील मुनंबमधील लोकांच्या संघर्षाचा शेवट होणार असल्याचे किरेन रिजिजू म्हणाले.
 
 
 
त्यांनी मुनंबमला हजारो तक्रारींमध्ये एक समस्या सांगत वक्फ संशोधनच्या भविष्यात अशा प्रकारे होणाऱ्या वाद विवादाला विरोध दर्शवला आहे. केंद्रीय मंत्री रिजिजूने सांगितले की, केंद्र सरकारच्या वतीने अधिनियम कलम ४० रद्द करण्यात येणार आहे. ज्यात आता वक्फ बोर्डाने कोणत्याही जमिनीवर एकतर्फी दावा करण्याचा कोणताही अधिकारी नाही.
त्यांनी केरळ सरकारला अशा प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रिजिजू म्हणाले की, कायदा बनवण्यात आला आहे तर राज्य सरकारने कायदा लागू कारावा. हे लक्षात घेण्यासारखे आहे की केरळ वक्फ बोर्डाने मुनांबममधील ६०० मच्छिमारांच्या जमिनीवर दावा केला आहे, ज्यापैकी बहुतेक ख्रिश्चन आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121