कोकणात शरद पवार गटाला खिंडार! जिल्हाप्रमुखांसह असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

    16-Apr-2025
Total Views |
 
Shivsena
 
मुंबई : कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाप्रमुखांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला खिंडार पडले आहे. मंगळवार, १५ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
 
कोकणातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यासोबतच सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते पाटील, मनसे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, मनसे विद्यार्थी सेनेचे प्रतीक मोहिते पाटील, शिवाजीनगरचे उपाध्यक्ष विशाल पवार, मनसे शाखाध्यक्ष प्रणव जोशी, राजेंद्र बेंद्रे, रणजित ढगे पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनीही पक्षप्रवेश केला.
 
यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार तुकाराम काते, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच विधानसभा क्षेत्र संघटक रवींद्र लाड, युवासेना तालुका अध्यक्ष रणजित मालोरे, तालुकाप्रमुख नितीन साळवी, जिल्हा परिषद सदस्य स्वाती नवगणे, कानू पिंगळे, लता मुंडे तसेच माणगाव, म्हसाळा तळे गावातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.