आसामध्ये रोंगाली बिहू उत्सवादरम्यान भैरव मंदिराच्या आवारात गोमांस विक्री

    16-Apr-2025
Total Views |

Beef
 
दिसपुर : आसाममधील रोंगाली बिहू उत्सवादरम्यान श्रीभूमी जिल्ह्यातील निलंबझारमधील दत्ता गावात असलेल्या भैरवनाथाच्या मंदिराच्या आवारात गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा गोमांस विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रतिबंधित मांस सापडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली आहे.
 
अशातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या आवारात बंदी घालण्यात आलेल्या संशयास्पद मांसाचे तुकडे स्थानिक रहिवाशांना सर्वात आधी आढळले. अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर निलमबाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रथम तपास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
त्यांच्या खोलवर तापासानंतर, पोलिसांना घटनास्थळावरून एक आधार कार्ड आणि एक पॅनकार्ड असे ओळखपत्र सापडले, ज्यामुळे फकोर उद्दीन नावाच्या संशयिताची ओळख पटली आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. घटनेचे कारण आणि त्याभोवती अधिक माहिती शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या प्रकरणाच्या संवेदनशील स्वरुपाच्या पार्श्वभूमीवरील, कायदा अंमलबजावणी संस्था आणि समुदायर नेत्यांनी चौकशी सुरू असताना शांतता आणि जातीय सलोखा राखण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.