दापोली - मांदिवलीत उपसरपंचानेच केले सापाला ठार; आरोपीची सुटका

15 Apr 2025 11:58:11
 snake killing in dapoli



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
दापोली तालुक्यातील मांदिवली गावाचे उपसरपंचाने सापाला ठार करुन त्याची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल केल्याचा प्रकार घडला होता (snake killing in dapoli). यावर दापोलीतील वन्यजीव प्रेमींना आक्षेप घेतल्यावर दापोली वन विभागाने उपसरपंचाच्या विरोधात गुन्हा तर दाखल केला, मात्र त्याला न्यायालयात हजर केले नाही (snake killing in dapoli). वन्यजीव शिकारीच्या गेल्या काही प्रकरणांमध्ये दापोली वन विभागाने अशाच पद्धतीने 'बाॅण्ड'वर आरोपींना सोडले आहे. (snake killing in dapoli)

मांदिवली गावचे उपसरपंच चंद्रशेखर वेदपाठक यांनी ६ एप्रिल रोजी आपल्या घरात शिरलेला धामण साप मारला. सापाला मारुन वेदपाठक तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी सापाला मारण्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित केले. यासंबंधीची तक्रार दापोलीतील काही वन्यजीवप्रेमी संस्थांनी वन विभागाकडे केली. दापोली वन विभागाने त्यांना ताब्यात घेतले त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला, मात्र स्वसंरक्षणासाठी वेदपाठक यांनी सापाला मारल्याचे कारण देत त्यांना मुक्त कले. काही दिवसांपूर्वीच घडलेल्या रानकोंबडा शिकार प्रकरणात देखील वन विभागाने अशाच प्रकारची भूमिका घेतली. शिकार प्रकरणातील आरोपीला 'बाॅण्ड'वर सोडण्यात आले. त्यामुळे वन्यजीव गुन्ह्यांसंदर्भातील तपास दापोली वन विभाग कोणत्या आधारे करते, असा सवाल वन्यजीवप्रेमींकडून विचारला जात आहे.
Powered By Sangraha 9.0