मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असून आता या योजनेबाबत एक मोठी अपडेट पुढे आली आहे. लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांपैकी आठ लाख महिलांना आता १५०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेकरिता काही अटी आखून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्या महिला इतर शासकीय योजनेचा लाभ घेतात त्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येत नाही. दरम्यान, आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे कमी पैसे मिळणार आहेत.
राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत काही महिलांना वर्षाला सहा हजार रुपये लाभ मिळतो. याशिवाय या महिला केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेचाही लाभ घेतात. त्यामुळे आता त्या महिलांना एप्रिल महिन्यापासून लाडकी बहिण योजनेचे ५०० रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहेत.