पंचपरिवर्तन हे राष्ट्रधर्म आणि युगधर्म या दोन्हींशी जोडलेले : दत्तात्रेय होसबाळे

15 Apr 2025 17:37:44

Dattatray Hosbale

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dattatray Hosbale on Pancha Parivartan)
पंचपरिवर्तन हे राष्ट्रधर्म आणि युगधर्म या दोन्हींशी जोडलेले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. संघ शताब्दीनिमित्त कन्नड साप्ताहिक 'विक्रमा'ने विशेषांक प्रकाशित केला. यामध्ये सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्यासोबत साप्ताहिकाच्या संपादकाने एक मुलाखत केली. त्यामधे विचारलेल्या एका प्रश्नावर सरकार्यवाहंनी उत्तर दिले आहे.

हे वाचलंत का? : देदीप्यमान ज्योती म्हणून अहिल्यादेवींचे नाव चिरस्थायी, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे प्रतिपादन 

प्रश्न असा होता की, शताब्दी वर्षानिमित्त संघाने दोन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवली आहेत. शाखांची संख्या एक लाखापर्यंत वाढवणे आणि पंचपरिवर्तनाची कल्पना प्रत्यक्षात आणणे. हे वृत्तीतील बदलाचे संकेत देते का? त्यावर उत्तर देत सरकार्यवाह म्हणाले, हे सर्व संघाच्या विचारसरणीचे मूळ घटक आहेत. प्रगतीच्या मार्गावर उद्दिष्टे साध्य करण्याच्या उद्देशाने आपण पुढे जात असताना, नवीन दरवाजे उघडत राहतात. हिंदुत्व हे काही अमूर्त अध्यात्मिक ज्ञान नाही, तर ती जीवनपद्धती आहे. हिंदुत्वाचा अर्थ केवळ कलम ३७० हटवणे, गोरक्षण करणे किंवा अयोध्येत राम मंदिर बांधणे असा होत नाही. पंचपरिवर्तनात असलेल्या सर्व गोष्टी हिंदुत्वाचे प्रतीक आहेत. बदलत्या काळाशी जुळवून घेणे हा हिंदू समाजाचा स्वभाव आहे. जिवंत समाजात वेळोवेळी बदल आवश्यक असतो. या दृष्टिकोनातून पंचपरिवर्तन हे राष्ट्रधर्म आणि युगधर्म या दोन्हींशी जोडलेले आहे.

Powered By Sangraha 9.0