आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...
14-Apr-2025
Total Views |
रांची (Constitution) : झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असे वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरिया आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालेल, असे भाजप नेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हाफिजल हसनला आरसा दाखवला आहे.
गुजरात भाजपचे राज्य माध्यम सह-प्रमुख म्हणून कार्यरत असणारे झुबिन आशारा यांनी पुढे आरोप केला की, आपल्या राष्ट्राच्या पायापेक्षा धार्मिक कायद्याला श्रेष्ठ मानणाऱ्या लोकांचा समावेश आहे.
हसन अन्सारी यांनी शरियाला भारतीय संविधानाहून श्रेष्ठ म्हणणे धाडसी नाही, तर ते आपल्या लोकशाहीचा उघडपणे करण्यात आलेला अवमानच. इंडी अलायन्स अशा मानसिकतेने भरलेले असून जे धार्मिक कायदा आपल्या राष्ट्राच्या पायापेक्षा श्रेष्ठ मानतात, असे ते म्हणाले.
रविवारी देशभरात सुरू असलेल्या वक्फ निदर्शनांबद्दल बोलताना हसन म्हणाले की, एक मुस्लिम कुराण आपल्या हृदयात आणि संविधान आपल्या हातात ठेवतो. झामुमोच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अल्पसंख्याक व्यवहार मंत्री म्हणून काम करणारे हसन यांनी केंद्र सरकारवर मुस्लिमांना तुरुंगात पाठवण्यावरून लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप केला.
वक्फ ही काही नवीन संकल्पना नाही. गेल्या १,४००- वर्षांपासून अस्तित्वास असलेली संकल्पना आजही चालु आहे, माझ्यासाठी शरिया हा मोठा आहे. आपण कुराण आपल्या हृदयात आणि संविधान आपल्या हातात ठेवतो. म्हणूनच प्रथम शरियत आणि नंतर संविधानाला हातात धरू, असे ते एका स्थानिक प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाले आहेत.