तेलंगणा सरकारने एससी आरक्षणात लागू केले वर्गीकरण

14 Apr 2025 20:51:28
 
Reservation
 
 
हैदराबाद : तेलंगाना सरकारने अनुसूचित जाती आणि जमातीतील आरक्षण व्यवस्थेत वर्गीकरण लागू केले आहे. यामुळे आता मूळ आरक्षणामध्ये मोठा बदल निर्माण होण्याची शक्यता आहे. एससी समुदायातील तीन समुहांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून याचा लाभ आवश्यक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात यावा, असा याचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. 
संबंधित अहवालानुसार, सोमवार १४ एप्रिल २०२५ रोजी तेलंगाना राज्याचे सिंचन मंत्री एन. उत्तम कुमारी रेड्डी यांनी घोषणा केली की, राज्य सरकारने न्यायमूर्ती शमीम अख्तरच्या अध्यक्षतेखाली बनवण्यात आलेल्या आयोगाच्या शिफारशींच्या आधारे, एक सरकारी आदेश (GO) जारी केले आहे. 
नवीन आरक्षणाचे वर्गीकरणानुसार...
समूह १ , सर्वाधिक १५ मागासलेले समूदाय - १ % आरक्षण
समूह २, १८ मध्यम स्वरूपातील लाभार्थी ९ % आरक्षण
समूह ३, तुलनेने चांगल्या दर्जाचे २६ समुदाय ५ %
एकंदरीत, अनुसूचित जाती जमातीतील असणाऱ्या प्रवर्गातील अधीच अस्तित्वात असलेले १५ % आरक्षण आता या तीन गटांमध्ये विभागलेले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२५ रोजी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याला ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हणत मंत्री रेड्डी म्हणाले आहेत. त्यानंतर पुढे ते म्हणाले की, पूर्वीच्या सरकारने फक्त प्रस्ताव मंजूर केल्याचे सांगितले. आम्ही ते अंमलात आणल्याचा फुगीरपणा दाखवला आहे. तसेच राज्यातील सर्व सरकारी भरती आणि शैक्षणिक प्रवेश नवीन मॉडेल अंतर्गत केले जाणार आहेत. २०२६ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींची लोकसंख्या वाढल्यास आरक्षणाची टक्केवारी पुन्हा एकदा निश्चित केली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0