त्रिपुरात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या सात बांगलादेशींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    14-Apr-2025
Total Views |

Bangladeshis
 
आगरतळा (Bangladeshis) : त्रिपुरा राज्यातील बेलोनियामध्ये शनिवारी १२ एप्रिल २०२५ रोजी रात्री उशिरा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या सात बांगलादेशींना अटक करण्यात आली. बेलोनिया जिल्हा आणि सत्र न्यायालयाने १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
त्रिपुरा पोलीस सूत्रांनी सांगितले की, शनिवारी रात्री बेलोनिया शहरालगत अमजदनगर भागातून सीमा ओलांडून सात बांगलादेशींनी त्रिपुरात घुसखोरी केली. 
 
गप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलोनिया उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषभ यांच्या नेतृत्वाखाली आणि बेलोनिया पोलीस ठाण्याचे प्रभारी शिबू रंजन डे यांच्या प्रयत्नांनी, मनुरुमुख तबला चौमुहोनी परिसरातील नाका चेंकींग पाँईंटवर एक चारचाकी कार थांबवण्यात आली आणि तपासणी सुरू करण्यात आली. तपासणीदरम्यान, सात बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना ताबडतोब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आणि प्राथमिक चौकशीत, सातही जणांनी त्यांचे घर बांगलादेशात असल्याचे मान्य केले, असे पोलिसांनी सांगितले आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, बांगलादेशी नागरिकांनी असा दावा केला आहे की एका व्यक्तीने पैशाच्या बदल्यात त्यांना सीमा ओलांडण्यासाठी मदत केली होती. 
 
आम्ही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयात हजर राहण्याची मागणी केली आहे. परंतु न्यायालयाने त्यांना १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान आरोपींची नावे ही रॉबिन हुसैन वय वर्षे २९, मोहम्मद रफी वय वर्षे २५, अमजद हुसैन २७, शाहिदुर जज्जमान वय वर्षे २८, फज्जल २४, रेहान मोल्ला २१ आणि गियास उद्दीन वय वर्षे  ३५ अशी झाली आहे. त्यांच्याकडून सात अँड्रॉइड मोबाईल, एक कीपॅड मोबाईल, १.६४ लाख रुपये भारतीय चलन आणि १,०१,९३५ बांगलादेशी टाका जप्त करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.