भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने समुद्रातील ड्रग्ज तस्करीचा साठा केला जप्त

14 Apr 2025 15:40:14
  
अंमली पदार्थ
 
गांधीनगर (Drugs Smuggler) : भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. ज्यात त्यांना मोठे यश संपादन करता आले आहे, १२-१३ एप्रिलच्या रात्री भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाईमध्ये समुद्रातून तस्करी करत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, ज्याची किंमत सुमारे १८०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे औषध मेथाम्फोटामाइन असण्याची शक्यता असून यासंदर्भात अजूनही चौकशी सुरू आहे.
 
गुजरात दहशतवादी विरोधी संघटनेकडून विश्वासार्ह गुप्त माहिती मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय सागरी सीमेनजीक ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर, पश्चिम भागात गस्त घालणार्‍या तटरक्षक दलाच्या जहाजाने तातडीने कारवाई केली आणि संशयास्पद असलेली ओळख पटण्यास यश मिळवले आहे.
 
बोटीतील तस्करांना भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने प्रवेश केल्याची माहिती मिळताच त्यांनी असलेला अंमली पदार्थांचा सर्व साठा समुद्रात फेकून दिला आणि ते पळू लागले. समुद्रात टाकण्यात आलेल्या अंमली पदार्थांच्या मालाचा शोध घेण्यासाठी तटरक्षक दलाने आपली छोटी बोट सुरू करत मुख्य जहाजाने तस्करांचा पाठलाग केला.
 
बोटीने आयएमबीएल ओलांडल्यामुळे तटरक्षक दलाचा पाठलाग थांबवावा लागला, तरही समुद्रात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान पथकाला अंमली पदार्थ सापडले, जे आता तपासाणीसाठी पोरबंदरलाआणण्यात आले आहे. ही कारवाई अलिकडच्या काळात आयसीजी आणि दहशतवादी विरोधी संघटनेने मिळवलेले १३ वे मोठे यश आहे. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिपादन केले आहे.
 
 
 
अमित शाह यांचे ट्विट
 
त्यांनी ट्विट करत माहिती दिली की, "मोदी सरकार अंमल पदार्थांचा नाश करण्यास यश संपादन करत आहे. नशा मुक्त भारत बनवण्याचा निरंतर प्रवास सुरू आहे. आंतरराष्ट्रीय सागरी सीमानजीक १८०० कोटी रुपयांचे एकूण ३०० किलो ड्रग्स जप्त करत एक मोठी कामगिरी झाली आहे.अंमली पदार्थाना नायनाट करण्यासाठी मोदी सरकारच यशाचे एक उत्तम उदाहरण आहे", असे अमित शाह यांनी ट्विट केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0