हैदराबाद: ( Congress MP on Wakf Act ) ‘एमआयएम’चे नेते असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी एका सभेतून “केवळ 15 मिनिटे द्या, आम्ही काय करतो पाहा,” असे देशविघातक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता ‘सुधारित वक्फ कायदा’ देशभर लागू झाल्यानंतर त्याविरोधात जिहाद्दी मानसिकेतून आंदोलने करण्यात येत आहेत.
अशातच काँग्रेस खा. इम्रान मसूद यांनी ‘वक्फ कायद्या’बाबत मोठे विधान केले आहे. “आम्ही सत्तेत आलो, तर एका तासात ‘वक्फ कायद्या’त बदल करू,” असा धमकी वजा इशारा अलीकडे मुस्लिम मिल्ली कौन्सिलच्या प्रकट कार्यक्रमात बोलताना त्यांनी वक्फ सुधारित कायद्यात बदल करण्याच्या संदर्भात मुस्लिमांनी काँग्रेसचे सरकार दिल्लीत आणावे आणि ते आल्यानंतर एक तासात आपण कायद्यात बदल करू अशा प्रकारची दर्पोक्ती केली ते एक प्रकारचे स्वप्न रंजन आहे. मुस्लिम तुष्टीकरणासाठी हि मंडळी संविधानाचा अपमान करीत आहेत. सकल हिंदू समाजाने याकडे गंभीरपणे बघायला हवे.