दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा चव्हाट्यावर! पक्षाच्या मेळाव्याला खैरेंची दांडी
14-Apr-2025
Total Views |
छत्रपती संभाजीनगर : उबाठा गटातील नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अंबादास दानवे यांनी बोलवलेल्या पक्षाच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरेंनी दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, "अंबादास दानवे यांनी मेळाव्याबाबत मला सांगितले नाही. मी उद्धव साहेबांना सांगणार आहे. अंबादास दानवे स्वत:ला खूप मोठे समजतात. आम्हाला तुम्ही कचरा समजता का? मी शिवसेना वाढवली. तुरुंगात गेलो, लाठ्या खाल्ल्या तुम्ही काय केले? मी आधी होतो नंतर हा आला आणि काड्या करण्याचे काम केले. मला कुणी काढू शकत नाही कारण मी बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे," असे ते म्हणाले.
यावर अंबादास दानवे यांनी मात्र, विरोधात उत्तर दिले. ते म्हणाले की, चंद्रकांत खैरे यांना मी बोलवले होते. पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांना नागपूरला त्यांच्या समाजाच्या मेळाव्याला जायचे असल्याने उपस्थित नव्हते," असा दावा त्यांनी केला. दरम्यान, यानिमित्ताने खैरे विरुद्ध दानवे या वादात पुन्हा एकदा भर पडली आहे.