नवी दिल्ली : (PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये काय म्हटले होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०११ मध्ये अमेरिकेत झालेल्या तहव्वूर राणाच्या एका खटल्याच्या निकालावर द्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली होती. त्यामध्ये पंतप्रधान मोदींनी तत्कालीन यूपीए सरकारवरही निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदींनी तत्कालीन यूपीए सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली होती. मोदींनी तेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले होतं की, "मुंबई हल्ल्यातील सुत्रधार तहव्वर राणाला निर्दोष घोषित करणं हे भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान असून भारताच्या सार्वभौमत्वाला कलंकित करणारे आहे. हा परराष्ट्र धोरणासाठी हा एक मोठा धक्का आहे", असं नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
US declaring Tahawwur Rana innocent in Mumbai attack has disgraced the sovereignty of India & it is a “major foreign policy setback”
आता या ट्विटवर, अनेक लोक तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांचे यश म्हणत आहेत . त्याच वेळी, काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे लोक याचे श्रेय त्यांच्या पक्षाला देत आहेत. ते म्हणणे आहे की, राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया यूपीए सरकारने सुरू केली होती आणि धोरणात्मकदृष्ट्या पुढे गेल्यामुळे राणाला भारतात आणता आले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\