युपीआय बंद, युजर्सना मोठा फटका, तक्रारींचा पडला पाऊस

गुगलपे, फोन पे सारख्या सर्वच ॲपधारकांना फटका

    12-Apr-2025
Total Views |
 
upi
  
मुंबई : आपल्या सर्वांनाच ऑनलाईन पैसे भरताना अडचण येत आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय युपीआय धारकांना शनिवारी जोरदार फटका बसला आहे. शनिवारी सकाळपासून युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजे युपीआय सवेमध्ये काहीतरी तांत्रिक समस्या उद्भवली आहे. त्यातून युपीआयद्वारे कुठलेही व्यवहार होत नाहीत. ऑनलाईन व्यवहारांची सर्वच ॲप्स जसे की गुगल पे, फोन पे, पेटीएम या सर्वच ॲपधारकांना व्यवहार करताना अडचणी येत आहेत. तसेच बँकांची ॲप्समधून कुठलेही व्यवहार होत नाहीयेत.
 
यामुळे देशभरातील सर्वच युजर्समध्ये खळबळ माजली आहे. आतापर्यंत २२०० तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. युपीआयमध्ये काहीतरी गेल्या तीन आठवड्यांतील ही तांत्रिक समस्या उद्भवून, अडचणी निर्माण होण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे देशभरातून यावर संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे समाजमाध्यमांवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
  
 
 
 
युपीआयचे व्यवस्थापन करणारी भारतातील नियामक संस्था नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एनपीसीआयकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार “युपीआयमध्ये अचानक तांत्रिक समस्या उद्भवली आहे. त्यामुळे युपीआयवरुन होणारे सर्व व्यवहार पूर्ण होऊ शकत नाहीत. सर्व स्थिती सुरळीत करण्याचे आमचे प्रयत्न सुरु असून लवकरच त्याबद्दल माहिती दिली जाईल” असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच युपीआयची सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.
 
 
 
 
यावरुन लगेचच समाजमाध्यमांवर मिम्सचा पाऊस पडला आहे. हॅशटॅग युपीआय सारखे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आले आहेत. त्यामुळे सध्या देशातील सर्वच आर्थिक व्यवहारांना धक्का बसला आहे.