काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

12 Apr 2025 18:30:09

ED
 
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे.
 
सक्तवसुली संचालनालयाने म्हटले की, हे पाऊल एजेएल मनी लाँड्रिंग प्रकरणात केलेल्या कारवाईचा एक भाग आहे. जो मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ च्या कलम ८ आणि मनी लाँड्रिंग प्रतिबंधक नियम, २०१३ अंतर्गत संबंधित नियमांनुसार केले गेले आहे. एजेएल आणि यंग इंडियन यांच्याशी संबंधित असलेल्या मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून ईडीने नोव्हेंबर २०२३ मध्ये स्थावर मालमत्ता जप्त केल्या होत्या.
 
नॅशनल हेराल्ड प्रकाशित करणारी एजेएल ही यंग इंडियन खासगी कंपनी आहे.ही कंपनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना प्रत्येकी ३७ % हिस्सा धारण करते, ज्यामुळे ते बहुसंख्य भागधारक बनले. यंग इंडियन आणि एजेएलच्या मालमत्तेचा वापर १८ कोटी रुपयांच्या बोगस देणग्या, ३८ कोटी रुपयांचे बोगस आगाऊ भाडे आणि २९ कोटी रुपयांच्या बोगस जाहिरातींच्या स्वरुपात गुन्ह्यातून पुढील उत्पन्न मिळवण्यासाठी करण्यात आला, असा आरोप सक्तवसुली संचालनालयाने केला आहे.
 
नॅशनल हेराल्ड प्रकाशित करणारी एजेएल ही यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकी हक्काची कंपनी आहे. ही कंपनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी प्रत्येकी ३८% हिस्सा धारण करते, ज्यामुळे ते बहुसंख्य भागधारक बनतात. "यंग इंडियन आणि एजेएलच्या मालमत्तेचा वापर १८ कोटी रुपयांच्या बोगस देणग्या, ३८ कोटी रुपयांचे बोगस आगाऊ भाडे आणि २९ कोटी रुपयांच्या बोगस जाहिरातींच्या स्वरूपात गुन्ह्यातून पुढील उत्पन्न मिळविण्यासाठी करण्यात आला," असा आरोप सक्तवसुली संचालनालयाने केला आहे.
 
Powered By Sangraha 9.0