‘दि जळगाव पीपल्स को.ऑप बँके’तर्फे ‘खान्देश पापड महोत्सव’

    11-Apr-2025
Total Views |
 
Khandesh Papad Festival organized by The Jalgaon People Co-op Bank
 
ठाणे: ( Khandesh Papad Festival organized by The Jalgaon People Co-op Bank ) ‘दि जळगाव पीपल्स को.ऑप बँके’तर्फे डोंबिवली शाखेत ‘खान्देश पापड महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. महिला बचतगट सदस्यांतर्फे बनवलेल्या खान्देशी पापडाची व इतर उत्पादनांची विक्री व प्रदर्शनाचे आयोजन दि. 9 एप्रिल ते दि. 13 एप्रिल रोजीपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत बँकेच्या डोंबिवली शाखेत भडसावळे बंगला, जानकी रघुनाथ रेसीडेन्सी, आगरकर रोड, डोंबिवली (पूर्व) येथे केले आहे.
 
महोत्सवाचा शुभारंभ बचतगट विभाग प्रमुख शुभश्री दप्तरी, मुंबई रिजनचे क्लस्टर हेड पंकज महाजन, डोंबिवली शाखाधिकारी अतुल आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
 
या महोत्सवात बिबडे, नागली पापड, कुरडई, पोंगे, करोडे मुगाचे/मिक्स डाळीचे वडे, साबुदाणा चकली व पापड, बटाटा वेफर्स, घरगुती लोणचे, पायपुसणी अशी बचत गटाची दर्जेदार व घरगुती उत्पादने येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. तरी बँकेतर्फे आवाहन करण्यात येते की, एकदा अवश्य भेट देऊन व उत्पादने खरेदी करून बचतगटांना प्रोत्साहित करावे.