भारतीय बाजारात सोन्याची उच्चांकी पातळी, तोळ्यामागे ९३ हजारांचा भाव

ऐन लग्नसराईत सामान्यांना फोडला घाम

    11-Apr-2025
Total Views |
prices
 
 
मुंबई : भारतातीय बाजारातील सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. भारतीय बाजारातील सोन्याच्या भावांनी प्रतितोळा ९३,०७४ रुपयांची पातळी गाठली आहे. सोन्याच्या भावातील या चढाईमुळे ऐन लग्नसराईच्या काळात नागरिकांच्या तोंडाला यामुळो फेस येणार आहे हे नक्की. भारतातील सोन्याच्या भावांमध्ये तब्बल ३ हजार रुपयांची वाढ झाली असून आता सोन्याचे भाव लवकरच लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. याच्या जोडीला चांदीच्या भावांनी देखील लाखांच्या जवळ जाण्यास सुरुवात केली असून, चांदीचा भाव प्रति किलोमागे ९७,१०० रुपयांवर पोहोचला आहे. ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना हा मोठा झटकाच आहे.
 
सोन्याच्या भावांनी दिल्ली, मुंबई यांच्यासह सर्वच प्रमुख शहरांमध्ये हा भाव गाठला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ८५,७६० रुपयांपर्यंत गेले आहेत. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ९३,५४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मुंबई मध्येही सोन्याच्या भावांनी लाखाच्या घरात जात आहेत. २२ कॅरेट सोन्याचे भाव ८५,६१० रुपयांपर्यंत गेले आहेत. तर २४ कॅरेट सोन्याचे प्रतितोळा ९३, ३९० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यातून भारतीय बाजारात सोन्याचे भाव सध्या तरी सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.
 
सोन्याच्या या वाढत्या किंमतींमागे जागतिक पातळीवरचे अस्थिर राजकारणच कारणीभूत आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील ७० देशांवर आयातशुल्क लादण्याची कारवाई केली आहे. परंतु काहीच दिवसांत त्या आयातशुल्क लादण्याला त्यांच्याकडून स्थगिती देण्यात आली होती. तरीही चीनवरचे आयातशुल्क १२५ टक्क्यांवर नेल्यामुळे परत एकदा आंतरराष्ट्रीय बाजाराला धक्के बसले त्यामुळे परत एकदा गुंतवणुकदारांचा कल हा सोन्याकडे वळतोय. ही सर्व या भाववाढीची महत्वाची कारणे आहेत.