वाराणसी दौऱ्यावर नरेंद्र मोदींनी वाचला विकासाचा पाढा, ३८८४.१८ करोड रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी करताना कामांचा पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन
11-Apr-2025
Total Views |
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुक्रवारी ११ एप्रिल २०२५ रोजी लोकसभा निवडणूक लढवलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात ५० वा दौरा केला. ज्यात त्यांनी वाराणसीकरांना विकास प्रकल्पाची भेट दिली. सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी लाल बहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहंदीगंज येथे दाखल झाले, त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यानिमित्ताने नरेंद्र मोदी यांनी एकूण ३८८४.१८ करोड रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली, ज्यात पर्यटन, तांत्रिक शिक्षण, महिला सशक्तीकरण, ऊर्जा आणि परिवहन संबंधित असणार्या योजनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील असणाऱ्या तीन संस्थांना GI प्रमाणपत्र प्रदान केले आणि ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत ७० वर्षांहून अधिक वयोगटातील वृद्धांना स्वास्थ कार्ड प्रदान करण्यात आले आहेत. अशातच अतिरिक्त, राज्यातील सर्व दूध डेअरींना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी १०१ कोटी रुपयांचा बोनसही दिला.
काशी का तेजी से चहुंमुखी विकास हो रहा है। इसी कड़ी में आज विभिन्न विकास परियोजनाओं का लोकार्पण-शिलान्यास करना मेरे लिए सौभाग्य की बात है। https://t.co/6vY4qCCLYp
आपल्या दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदी यांनी काशी हिंदू विश्वविद्यालयात त्यांनी एमपी नॉलेज कॉम्पिटिशन, एमपी फोटोग्राफी कॉम्पिटिशन आणि एमपी संस्कृत कॉम्पिटिशनमधील सहभागी असणाऱ्यांशी संवाद साधत त्यांचा सन्मान केला. त्यांनी संत गुरू रविदास यांच्या जन्मस्थळी प्रार्थना केली आणि त्यांच्या ६४७ व्या जयंती समारंभात भाग घेतला.
दरम्यान, ९ वर्षांमध्ये काशीमध्ये सोई सुविधांचा मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत असून ज्यात रोजगाराचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे पर्यटनाचाही समावेश असून त्यात वृद्धी झाली आहे. त्यांनी वाराणसीच्या विकासकामांचे आश्वासन दिले आहे. विकासकामांचा पाठपुरावा स्वत:नरेंद्र मोदी करणार असल्याचे ते म्हणाले होते.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी निरोधकांवरही निशाणा साधला ते म्हणाले की, सत्ता मिळवण्यासाठी लोक खेळ खेळत राहतात, मात्र, माझं ध्येय हे कुटुंबाची साथ आणि कुटुंबाचा विकास हेच माझं ध्येय आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.