गतीमंद तरुणीवर रिक्षा चालकाने केला बलात्कार

10 Apr 2025 17:12:35
 
woman raped by rickshaw driver in dombivali
 
डोंबिवली: ( woman raped by rickshaw driver in dombivali ) एका गतीमंद तरुणीवर एका रिक्षा चालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना डोंबिवलीत घडली आहे. आरोपी रिक्षा चालक फैजल खान याला टिळकनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने अटक केली आहे. कोर्टाने आरोपीला १४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
 
डोंबिवलीतील टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हददीत राहणारी ३१ वर्षीय तरुणी जी गतीमंद आहे. तिला एका कल्याण ग्रामीण परिसरातील सोनारपाडा परिसरात एका नातेवाईकच्या घरी जायचे होते. ७ एप्रिल रोजीची ही घटना आहे. या तरुणीने एक रिक्षा पकडली. मात्र काही तासानंतर त्या तरुणीने घडलेल्या प्रकाराबद्दल तिच्या नातेवाईकांना सांगितले. रिक्षा चालकाने तिला सोनारपाडा येथे न सोडता मुंब्रा येथील एका निर्जन स्थळी नेले. तिच्यावर त्याने अतिप्रसंग केला. या घटनेची माहिती मिळताच तरुणीच्या आईने ९ एप्रिल रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
 
टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. रिक्षा चालकाचा शोध सुरु केला. पोलिसांनी सोनारपाडा पर्यंतचे सीसीटीव्ही तपासले. त्यात रिक्षाचा नंबर पोलिसांच्या हाती लागला. डीपीसी अतुल झेंडे, एसीपी सुभाष हेमाडे आणि टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु झाला. सीसीटीव्ही तपासताना पोलिसांना रिक्षा चालकाचा नंबर सापडला होता. त्या सहाय्याने त्याचा पत्ता देखील पोलिसांच्या हाती लागला. ९ एप्रिल रोजीच्या रात्री पाेलिसांनी आरोपी फैजल खान याला दिवा येथून अटक केली आहे. गुरुवारी दुपारी आरोपी फैजल खान याला टिळकनगर पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केले आहे. त्याला कोर्टाने १४ एप्रिल रोजी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
  
या प्रकरणी आरोपीची बाजू वकिल अनिरुद्ध कुलकर्णी यांनी मांडली आहे. ७ एप्रिल रोजीची घटना आहे. दोन दिवसांनी एफआयआर झाला आहे. त्यामुळे या घटनेत तथ्य वाटत नाही. आरोपीचा यात काही रोल नाही असे न्यायालयास सांगितले. तपासाचा भाग म्हणून न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी तपास अधिकारी वैद्यकीय चाचणी आणि तपासाकरीता मागितली होती. न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस या घटनेचा तपास करीत आहे. मात्र या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे.
Powered By Sangraha 9.0