मुंबई,दि.९: नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीआरपी विविध उपक्रमांच्या माध्यमातून धारावीकरांच्या स्वप्नातील धारावीचे चित्र समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून एनएमडीपीएलचा सामाजिक उपक्रम असणाऱ्या धारावी सोशल मिशनने शालेय तरुणींसाठी आणि शिक्षकांसाठी 'स्वप्नातील धारावी' या विषयावर निबंध लेखन स्पर्धा घेतली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि.८ रोजी संपन्न झाला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत धारावीतील २२ शाळांना सहभागी करून घेत एका अनोख्या निबंध स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत धारावीतील विविध माध्यमातील शाळेतील मुली आणि शिक्षिकांनी सहभाग घेतला. २२ शाळांमधून १ हजार निबंध या स्पर्धेत जमा झाले. या सर्वच निबंधातून विद्यार्थ्यांनी आणि शिक्षिकांनी धारावीचे स्वप्न शब्दात मांडले. या १ हजार निबंधातून १० निबंधांना विशेष लेखनासाठी गौरविण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट ३ निबंधांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. याचसोबत लेखिका शिक्षिकांमधूनही ३ निबंधांना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर, ज्येष्ठ पत्रकार अनुषा सुब्रमणियम, ज्येष्ठ पत्रकार राजेश विक्रांत, लेखिका रेखा निगम यांनी केले. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टरप्लॅन बनविण्याच्या कामाने वेग घेतला आहे. अशावेळी धारावीकरांना नव्या धारावीत कोणत्या सोयी-सुविधा, उपक्रम आणि धारवीकरांच्या स्वप्नातील धारावी नेमकी कशी असावी हे जाणून घेण्याचा प्रयत्न एनएमडीपीएलकडून केला जात आहे. यासाठी एनएमडीपीएलच्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि उपक्रमाचे आयोजन धारावीत केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून ही स्वप्नातील धारवी साकारण्याची संधी डीएसएमने शालेय विद्यार्थ्यांना दिली होती.
---------
"धारावीत खूप अस्वच्छता आहे. यासोबतच महिलांवर अत्याचारही होतो अशा घटना कानावर येत असतात. त्यामुळे हे सगळं थांबावं, महिलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ धारावी असे स्वप्न मी माझ्या नव्या धारवीच्यानिमित्ताने पाहते आहे."
- कमली, विद्यार्थिनी
"मी लहानपणापासून धारावीत राहते आहे. मला निबंध लून स्वप्नातील धारावी साकारण्याची संधी दिली त्यासाठी डीएसएमचे आभार मानते. धारावीत रुग्णालये चांगले असावे. महिलांना सुरक्षितता मिळावी अशी मागणी आहे."
- लिसा, विद्यार्थिनी
"मी हिंदी आणि मराठी हे दोन विषय मी शिकवते. धारावीत सुक्षित आणि स्वच्छ वातावरण असेल अशी आमच्या स्वप्नातील धारावी आहे. आम्ही शब्दांकन केलेली धारावी प्रत्यक्षात उतरेल याची मला पूर्ण खात्री आहे."
- सीमा नायडू, शिक्षिका
"आम्ही या स्पर्धेचे परीक्षण केले. हजारो निबंध आम्ही वाचले. या तरुणी आणि शिक्षकांनी आपल्या विषयांतून धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी प्रकर्षाने काही सूचना दिल्या आहेत. इतक्या लहान वयात धारावीची जी स्वप्न पाहत आहेत ती नक्कीच थक्क करणारी आहेत. इतक्या निबंधात कोणीही या प्रकल्पाला विरोध केलेला नाही. प्रत्येकाला तिथे आर्थिक विकासाचं केंद्र असावं,स्वच्छ असावं, तिथे चांगली योजना असाव्या, वैद्यकीय सुविधा असाव्या आणि लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण व्हावा याची आस या मुलांना आहे."
- मृणालिनी नानिवडेकर, परीक्षक तथा पत्रकार
"या सगळ्या मुलांना धारावीत स्वच्छता हवी आहे. या सगळ्या मुलांच्या मनात स्वच्छता, मुलींचे हक्क, त्यांची सुरक्षा हे सगळं या छोट्या छोट्या मुलींनी अत्यंत संवेदनशीलपणे लिहिले आहे. या मुलीचे विचार बघून मला खूप आश्चर्य वाटते आहे."
- रेखा निगम,परीक्षक तथा लेखिका
"माझ्या स्वप्नातील धारावी ही जागतिक सर्वात सुंदर शहर धारावी असावी असे वाटते. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की धारावी कशी होती आणि आज किती सुंदर आहे."
- सृष्टी, विद्यार्थिनी
विजेते
शिक्षक:
1. सीमा नायडू, मॉर्निंग स्टार इंग्लिश स्कूल
2. गीतांजली महादेव यादव, श्रमिक विद्यापीठ
3. जेलिट्टा बालसिंग, धारावी टी.सी.मुन तमिळ शाळा
विद्यार्थी:
1. जोया एजाज शेख, गुरुनानक शाळा
2. झोया अन्सारी, धारावी टी.सी.मुन इंग्लिश स्कूल क्रमांक क्र. १
3. जेनिसा वेथराज, कानोसा हायस्कूल
उपविजेते:
1. भक्ती महादेव वाकोद, संत कक्कया मार्ग मराठी शाळा क्र. १
2. अलीना मुजीब खान, मॉर्निंग स्टार इंग्लिश स्कूल
3. प्राची कौशल शारदा प्रसाद, गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल
4. दर्शना कांतीभाई घोघारी, गुरु नानक नॅशनल हायस्कूल
5. झैनब बेगम मोहम्मद वाली आलम, धारावी टी.सी.मुन माध्यमिक उर्दू शाळा
6. सृष्टी संजय वाघेकर, श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल (मराठी माध्यम)
7. कमली चेझियान, मॉर्निंग स्टार इंग्लिश स्कूल
8. लिशा शर्मा, मॉर्निंग स्टार इंग्लिश स्कूल
9. मुथुअंजना सेल्वापेरुमल, गुरु नानक नॅशनल हायस्कूल
10. निशा दास, श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल (इंग्रजी माध्यम)