एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती!

    10-Apr-2025
Total Views |
 
Pratap Sainaik
 
मुंबई : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या विकासात आणि परिवहन व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी माझे प्रयत्न सतत सुरू राहतील, अशा भावना प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केल्या.
 
महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. "या तिन्ही नेतृत्वांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ अध्यक्षपदी जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी माझ्यासाठी केवळ पद नाही, तर जनसेवेची एक अनमोल संधी आहे. प्रवाशांची सेवा, महामंडळाचा विकास आणि नागरिकांच्या सोयीसाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन," असा संकल्प त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
 
हे वाचलंत का? -  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने ३० कोटींचा निधी वापरलाच नाही! अहवालात धक्कादायक माहिती उघड
 
अर्थखात्याकडून वेळेवर पैसे मिळाल्यास फायदा
 
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "आमची प्रवाशी संख्या वाढली आहे. पंरतू, शासनाकडून अर्ध्या तिकीटाचे प्रतिपुर्तीच्या माध्यमातून मिळतात. हे पैसे वेळेवर मिळाले तर आम्ही फायद्यात जाऊ. पण कधी कधी अर्थखात्याकडून पैसे वेळेवर मिळत नसल्याने समस्या निर्माण होतात. त्यामुळे आम्हाला अर्थखात्याकडून योग्य ते सहकार्य मिळावे अशी विनंती ममी अर्थमंत्री अजित पवार यांना विनंती केली आहे," असे त्यांनी सांगितले.