मुंबई: ( Anant Ambani at Shri Siddhivinayak temple ) रिलायन्स ग्रुपचे संचालक अनंत अंबानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. अनंत अंबानी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भगवान श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचे वडील मुकेश अंबानी देखील उपस्थित होते.
अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त, मंदिर ट्रस्टच्या वतीने, ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मंदिराचे विश्वस्त महेश मुदलियार, गोपाळ दळवी, श्रीमती मनीषा तुपे, सुदर्शन सांगळे, कार्यकारी अधिकारी श्रीमती वीणा पाटील उपस्थित होते.
अलिकडेच अनंत अंबानी यांनी व्दारकेला पोहोचून १७० किमीची आध्यात्मिक पदयात्रा पूर्ण केल्याची माहिती आहे. त्यांनी २८ मार्च रोजी जामनगरमधील मोती खावडी येथून आपला प्रवास सुरू केला. भेटीनंतर त्यांनी भगवान व्दारकाधीशांचे आभार मानले. असे सांगण्यात येते की सध्या ते वन्यजीव संवर्धनाशी संबंधित त्याच्या “वनतारा” मुळेही चर्चेत आहे. वनतारा हे वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र आहे.