बीड कारागृह मारहाण प्रकरणानंतर 'या' तीन आरोपींना नाशिक कारागृहात हलवलं! कारागृह प्रशासनाच्या हालचाली वाढल्या

01 Apr 2025 13:45:48
 
athawale gang sent to nashik jail after gangwar in beed Jail
 
बीड : (Beed District Jail) बीडच्या जिल्हा कारागृहात सोमवार दि. ३१ मार्चला वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि बबन गिते टोळीचा महादेव गिते एकमेकांना भिडल्याचे समोर आले. कारागृहात गिते आणि कराड समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर महादेव गितेसह आणखी चार जणांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले होते. तसेच आता मकोका मधील आठवले टोळीतील आरोपींची रवानगीही नाशिक कारागृहात करण्यात आली आहे.
 
कारागृहात झालेल्या वादानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. वाद वाढू नये यासाठी कारागृह प्रशासनाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. महादेव गिते टोळीनंतर आता अक्षय आठवले टोळीला हलवण्यात आले आहे. यातील आरोपी अक्षय आठवले, मनिष क्षीरसागर आणि ओंकार सवाई यांना हलवण्यात आले आहे. महादेव गितेचा वाद असताना आम्हाला नाहक हलवले जात आहे, असा ओंकार सवाई याने आरोप केला आहे. कालच्या वादानंतर महादेव गितेला हर्सुल कारागृहात तर आठवले टोळीची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0