रिझर्व्ह बँकेचा आज ९० वा स्थापना दिवस

01 Apr 2025 15:23:53
 
Reserve Bank of India 90th foundation day today
 
मुंबई : ( Reserve Bank of India 90th foundation day today ) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेचा ९०वा स्थापना दिन साजरा होणार आहे.
 
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती सोमवार, दि. ३१ मार्च रोजी मुंबईत दाखल झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, पर्यटन व खाणमंत्री शंभूराज देसाई, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व इतर मान्यवर उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0