मुंबई : पाथर्डी तालुक्यातील अकोला गावात ५४ मतदार बांग्लादेशी आढळले असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांकडून समिती गठित करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
पाथर्डी तालुक्यातील अकोला गावात ५४ बांगलादेशी मतदार आढळले आहे. दरम्यान, अकोला ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी पंचनामा करून तहसीलदारांना कारवाई करण्यासाठी सांगितले असून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली कारवाई साठी समिती गठीत केली आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.
हे वाचलंत का? - उबाठांनी पाळलेल्या पोपटाने...; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर घणाघात
राज्यातील वाढते बांग्लादेशी आणि घुसखोरांचे प्रमाण लक्षात घेता किरीट सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. पाथर्डी तालुक्याच्या तहसीलदारांनी गठित केलेल्या समितीमध्ये मंडळाधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, आता यासंदर्भात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.