आयएफएस निधी तिवारी यांची पंतप्रधानांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती

    01-Apr-2025
Total Views |
 
IFS Nidhi Tiwari appointed as Private Secretary to Prime Minister
 
नवी दिल्ली : ( IFS Nidhi Tiwari appointed as Private Secretary to Prime Minister ) भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
केंद्र सरकारतर्फे ही माहिती सोमवार, दि. ३१ मार्च रोजी देण्यात आली. कार्मिक मंत्रालयाच्या दि. २९ मार्च रोजीच्या आदेशात म्हटले आहे की, “मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने निधी तिवारी, आयएफएस (२०१४) यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून पंतप्रधानांच्या खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.
 
ही नियुक्ती वेतन मॅट्रिक्सच्या लेव्हल १२ मध्ये तत्काळ लागू होईल. ही नियुक्ती सह-टर्मिनस आधारावर किंवा पुढील आदेशापर्यंत, जे आधी असेल तोपर्यंत होईल,” असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.