भाजप संघटन पर्व बैठक संपन्न

01 Apr 2025 14:03:57
 
BJP meeting thane
 
ठाणे: ( BJP meeting thane ) भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व खा. अरुण सिंह व राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी ठाण्यात येऊन भाजपच्या संघटन पर्वाबाबत बैठक घेऊन आढावा घेतला. बैठकीत आतापर्यंत झालेल्या संघटनात्मक निवडणुकीच्या कामांबरोबरच पक्षाच्या पुढील कार्यक्रमांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
 
भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयात भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश शनिवार, दि. २९ मार्च रोजी सकाळी दाखल झाले. प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाणे विभाग स्तरावर झालेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीबाबत विविध सूचना देण्यात आल्या.
 
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. वाघुले यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. दिवसभर झालेल्या आढावा बैठकीला पक्षाचे ठाणे विभागातील सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.
 
 
Powered By Sangraha 9.0