"आज भारतच विजयी होणार", टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

09 Mar 2025 16:31:52
 
Champions Trophy 2025
 
युएई (Champions Trophy 2025) : टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात ९ मार्च २०२५ रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबईमध्ये सुरू आहे. असातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचा सामना भारतच जिंकणार असल्याचा विश्वास माध्यमांशी बोलत असताना व्यक्त केला आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
 
यासामान्यादरम्यान, माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी आणि मराठी भाषेत टीम इंडियाचे कौतुक केले आहे. हम भारत के साथ है! जितेंगा तो भारतही, असे ते म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी भारतच सामना विजयी होणार आहे. १४० कोटी लोकसंख्येचे या सामन्याकडे लक्ष असणार आहे. त्याचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. भारताला सदिच्छा आहेत, आम्ही सारे भारतासोबत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी दिलेल्या या टीम इंडियाला शुभेच्छांप्रती आशीर्वाद आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
 
 
टीम इंडियाला न्यूझीलंडने २०१९ च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये पराभूत करत सव्वाशे कोटी भारतीयांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. त्या पराभवाचाही टीम इंडिया वचपा काढण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावताना दिसत आहे.
 
टीम इंडिया विरूद्ध किवींदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना सुरू आहे. किवींनी टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत किवींचे चार गडी बाद झाले आहेत.
 
Powered By Sangraha 9.0