( International Womens Day Vidya Chaudhary ) 'विद्या विनयेन शोभते’ या संस्कृत सुविचारात ‘विद्या’ हे ज्ञान आणि ‘विनय’ म्हणजे विनम्रता याप्रमाणे सुशील आणि विनम्रतेने समृद्ध असलेल्या विद्या विजय चौधरी या ‘दि ठाणे डिस्ट्रिक्ट को. ऑप. हाऊसिंग फेडरेशन’मध्ये ज्येष्ठ संचालक म्हणून कार्यरत आहेत. गेली 17 वर्षे त्या सहकार क्षेत्रात असल्याने त्यांचे आप्तस्वकीय तसेच मित्रमंडळी त्यांना ‘विद्या सहकारात शोभते’ असे गमतीने म्हणतात.
विद्या चौधरी यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वालावल या गावी झाला. बालपण गावी कोकणात मजेत गेले. गावी जेमतेम ‘एस.एस.सी.’पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर विवाहानंतर सन 1980 मध्ये त्या ठाण्यात आल्या. गृहिणी म्हणून काम करीत असताना ठाण्याच्या वर्तकनगर, शिवाईनगर भागामध्ये शिवसेनेमधून त्यांनी सामाजिक कार्याला प्रारंभ केला. सुरुवातीला सेनेच्या कार्यकर्त्या म्हणून ठसा उमटविल्यावर विद्या यांची वर्तकनगर विभागाच्या उपशाखाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. समाजकार्यातील उल्लेखनीय कामाची दखल घेत 2008 मध्ये ‘ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या प्रेरणेने फेडरेशनच्या महिला प्रतिनिधी म्हणून निवडून आल्या. सामाजिक बांधिलकीमधून सहकाराची ओढ निर्माण झाली.
त्या माध्यमातून वर्तकनगर, लोकमान्य नगर, सावरकर नगर, शिवाई नगर भागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समस्या व त्या सोडविण्यासाठी विद्या यांनी प्रयत्न केले. ‘माजीवाडा कन्झ्युमर्स को-ऑप. सोसायटी लि.’ या संस्थेच्या त्या अध्यक्षाही होत्या. सध्या त्या संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. ‘सहकारातून समृद्धी’ हा मूलमंत्र जपत विद्या चौधरी यांनी ‘हाऊसिंग फेडरेशन’च्या निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. सध्या त्या शासनाच्या सहकार विभागाच्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पॅनलवर आहेत.
(अधिक माहितीसाठी संपर्क -9220532457)