लखनऊ (Ulfat Hussain arrested) : उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने मोठी कारवाई करत हिजबुल मजाहिदीनचा फरार असलेला आंतकवादी उल्फत हुसेनला मुरादाबादमधून अटक केली आहे. या आतंकवाद्याचा शोध घेण्यासाठी २५ हजार रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते. त्यानंतर आता एटीएसने कटघर पोलिसांसह संयुक्त कारवाई करत या आतंकवाद्याला अटक केली. तो गेली १८ वर्षांपासून फरार होता, आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्याने १९९९ ते २००० सालादरम्यान, पाकिस्तानातून प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर तो भारतात आला होता. आरोपी हा जम्मू आणि काश्मीर (पाकव्याप्त) रहिवासी असल्याची माहिती आहे. दहशतवादी विरोधी संघटना सहारनपूर पथकाने त्याला अटक केली आहे. दरम्यान, यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कौशंबी जिल्ह्यातून बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय एका कथित सक्रिय आतंकवाद्याला अटक केली.
या प्रकरणादरम्यान, २००१ नंतर सुरूवातीला उल्फलता एके-४७, पिस्तूल, ग्रेनेड आणि स्फोटकांसह पकडण्यात आला होता. त्यावेळी, जेव्हा त्याला जामिनावर सोडवण्यात आले. तेव्हापासून तो फरार होता. मुरादाबाद न्यायालयाने त्याच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी केला होता. त्यानंतर एटीएसच्या सहारनपूर पथकाने त्याला तब्बल १८ वर्षानंतर अटक केली आहे.