जयपुर : राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्यातील हिंदू भैरवनाथ देवाच्या मंदिराचे चर्चमध्ये रुपांतरण केल्याची घटना घडली आहे. संबंधित गावातील ग्रामस्थांनी काही वर्षांआधी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. हे चर्चही तेव्हाच बांधण्यात आले. आता पुन्हा एकदा धर्मांतर केलेल्यांनी घरवापसी करण्यात आली आहे. यानंतर, आता ग्रामस्थ बनावट चर्चचे मूळ मंदिरात रुपांतर करत आहेत. त्या मंदिरात भगवान भैरवनाथांच्या मूर्तीची स्थापना केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे प्रकरण बांसवाडा जिल्ह्यातील गंगारदतलीमधील सोदलादुधा गावातील आहे. भारत माता मंदिर प्रकल्पाच्या काही दिवस आधी, संबंधित गावातील ८० कुटुंबांनी घर वापसी करत मूळ हिंदू धर्म स्वीकारला. घर वापसीनंतर, गावात असलेल्या कुटुंबीयांनी भैरवनाथाच्या मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम हा रविवारी ९ मार्च रोजी करण्यात आला आहे.
एका प्रसारमाध्यमानुसार, गावातील गौतम गरसिया नावाच्या एका वृद्ध व्यक्तीने सांगितले की, त्याने ३० वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. तो त्या गावात धर्मांतर करणारा पहिला व्यक्ती आहे. यानंतर, त्यांच्या कुटुंबातील ३० सदस्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्याच्या प्रेरणेने इतर काही लोकांनीही ख्रिश्चन धर्म स्वीकारला. अशातच, त्याच्या धाकट्या भावाचे कुटुंब हे हिंदूच असल्याचे सांगण्यात आले.
गौतम म्हणतो की, ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर, ख्रिस्ती समुदायातील लोक त्याच्या गावाला भेट देऊ लागले. गौतम दर रविवारी मंदिरात जात असायचा आणि तिथे ख्रिस्ती धर्मासंबंधित प्रार्थना सभा घेत असायचा. यानंतर, त्या मंदिराचे हळूहळू चर्चमध्ये रुपांतर झाले. त्यावेळी अनेकजण बाहेरून त्या ठिकाणी येऊ लागले होते.
दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर ग्रामस्थांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास परावृत्त करण्यात आले. अनेकांनी ख्रिस्ती धर्मही स्वीकारल्याचे दिसून आले. गावातील चर्चला पुजारीही बनवण्यात आले. त्यानुसार त्याला महिना १५०० रुपये मानधन देण्यात आले.
गौतमची दोन्ही मुलांनी मूळ हिंदू धर्मात घर वापसी केली, तर गौतमची पत्नी अजूनही ख्रिश्चन आहे. त्यांनी सांगितले आहे की, गावातील ४५ लोकांपैकी ३० जणांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे. उर्वरित १५ लोकही लवकरच घरवापसी करतील असा दावा करण्यात आला आहे. घरी परतणाऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्या ख्रिश्चन असलेल्यांना हिंदू धर्म स्वीकारण्यास पटवून देण्याचा प्रयत्न करतात.