मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Saraswati Vidya Mandir) "सुशिक्षित, सुसंस्कृत व्यक्ती घडवणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. शिक्षण असे असले पाहिजे की ते व्यक्तीमध्ये स्वार्थाची नव्हे तर आपुलकीची भावना भरेल. संपूर्ण भारत एक आहे, आपण सर्व एकाच भूमीचे पुत्र आहोत, ही विचारसरणी समाजात रुजली पाहिजे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. विद्या भारती संचलित सरस्वती विद्या मंदिर वीरपूर सुपौळच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन गुरुवार, दि. ०६ मार्च रोजी सरसंघचालकांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला भारत-नेपाळ सीमा भागातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
हे वाचलंत का? : प्रत्येकाने आपल्या गावात ग्रामविकासाचे कार्य सुरू करावे : विनय कानडे
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक म्हणाले, "आपण जे काही कार्य करत असाल ते सत्यावर आधारित आणि लोक हिताचे असावे. कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. जनकल्याणाच्या भावनेने काम करून कार्याच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. नियती अनुकूल होण्यासाठी आपण सक्षम कर्ता बनले पाहिजे. आजकाल शाळा चालवणे हा एक व्यवसाय आहे, परंतु भारतात शिक्षण हे पैसे कमवण्याचे माध्यम नाही. जर माणूस फक्त स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरत असेल तर शिक्षणाचा अर्थ काय राहणार? शिक्षण माणूस घडवण्याचे काम करते.
शिक्षणाच्या उद्दिष्टाबाबत सरसंघचालक म्हणाले की, शिक्षण हे असे असले पाहिजे की ज्यामुळे माणसाला माणूस बनवता येईल. भारतात त्यागाची नेहमी पूजा केली जाते. आज अनेक लोक श्रीमंत होत आहेत, पण त्यांची कथा भारतात बनत नाही, दानशूर भामाशाहची कथा बनवली आहे, ज्याने स्वातंत्र्यासाठी राणा प्रतापला धन दान केले. दशरथ मांझी यांचे उदाहरण देताना ते म्हणाले की, दशरथ मांझी यांनी समाजहितासाठी खूप काही केले, त्यामुळेच समाज आज त्यांची आठवण करतो, त्यांनी लोककल्याणासाठी डोंगर खणला. भारतात असे बरेच लोक आहेत, ज्यांचे आपण अनुकरण केले पाहिजे. संपूर्ण जगाला भारताच्या छत्रछायेखाली सुख-शांतीचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी अशी शिक्षण व्यवस्था निर्माण केली पाहिजे.
विद्या भारतीच्या शाळांबाबत चर्चा करताना सरसंघचालक म्हणाले, विद्या भारतीच्या २१ हजाराहून अधिक शाळा देशभरात कार्यरत आहेत, ज्या विद्यार्थ्यांच्या चारित्र्य निर्मितीसाठी कार्यरत आहेत. विद्या भारतीच्या कर्तृत्वावर युएनओ २० बिलियन क्लबमध्ये त्याचा समावेश करण्याबाबतही सांगितले आहे.