मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Rambhau Mhalagi Smrutidin) छत्रपती शिक्षण मंडळच्या वतीने दरवर्षी स्व. रामभाऊ म्हाळगी स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाही गुरुवार, दि. ६ मार्च रोजी नुतन विद्यालय, कर्णिक रोड, कल्याण (प) येथील भव्य प्रांगणावर स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय ग्रामविकास प्रमुख विनय कानडे यांनी उपस्थितांना ग्रामविकासातून राष्ट्रविकास या विषयी संबोधित केले. आपल्या गावामध्ये ग्रामविकासाचे कार्य सुरू करण्याबाबात आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
हे वाचलंत का? : भारत-न्यूझिलंड सामन्यापूर्वी काँग्रेसी झाले रामभक्त
ते म्हणाले, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या काळच्या राजकीय नेत्यांनी जाणून बुजून शहरात उद्योग उभे केले व शहरे भरली, त्यामुळे गावाकडे दुर्लक्ष झाले. तसेच ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी आपल्या सर्वांसमोर ग्रामविकासाचे एक आदर्श गाव उभे केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ४५० गावी ग्रामविकासाचे प्रकल्प सुरु आहेत. उपस्थिती सर्वांनी आपल्या गावाशी संबंध ठेवावा व आपल्या गावामधे ग्रामविकासाचे कार्य सुरू करावे.
या कार्यक्रमाल छत्रपती शिक्षण मंडळाच्या विविध शाळांतील शिक्षक उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने नागरिक बंधु भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सरचिटणीस डॉ. निलेश रेवगडे यांनी केले, तर संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य फडके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला, कार्याध्यक्ष तरटे सर यांनी स्वर्गीय रामभाऊ माळगी यांच्या कार्याबद्दलची माहिती सांगितली सुरुवातीस महाराष्ट्र गीत होऊन संपुर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रम संपन्न झाला.