पुणे: ( Mukesh Prabhune son of Padma Shri Girish Prabhune Passes Away ) पिंपरी येथील रहिवासी मुकेश गिरीश प्रभुणे (वय ४९ वर्षे) यांचे शुक्रवार, दिनांक ०७ मार्च २०२५ रोजी पहाटे बिजलीनगर, चिंचवड येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
ज्येष्ठ समाजसुधारक आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. शांत, अबोल स्वभावाचे मुकेश प्रभुणे हे उत्तम चित्रकार होते. प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांच्या चित्रकारितेचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता.
मुकेश यांच्यावर काळेवाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीसह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली.