ज्येष्ठ कवयित्री अरूणा ढेरे यांना कुसुमाग्रज स्मृती सन्मान पुरस्कार जाहीर!

07 Mar 2025 12:39:44

aruna dhere
 
मुंबई: ( Kusumagraj Memorial Award announced for veteran poet Aruna Dhere ) मराठी साहित्यामध्ये संशोधन आणि संवेदनशीलतेचा अनोखा मिलाप घडवून साहित्यनिर्मिती करणार्‍या ज्येष्ठ कवयित्री अरूणा ढेरे यांना यंदाचा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या बहुमोल योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
 
‘विदिशा सांस्कृतिक मंचा’च्यावतीने ज्येष्ठ कवयित्री आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा अरूणा ढेरे यांना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान जाहीर करण्यात आला आहे. कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सोमवार, दि. 10 मार्च रोजी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या माधवराव पटवर्धन सभागृहात सायंकाळी 5 वाजता हा सन्मान सोहळा पार पडणार आहे.ज्येष्ठ साहित्यिक मधू कर्णिक यांच्या हस्ते ढेरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी उपस्थित राहणार आहेत
 
Powered By Sangraha 9.0