धर्मांतरण कायद्याला का होतोय अरूणाचल प्रदेशात विरोध?

07 Mar 2025 15:08:29
 
Anti-Conversion Law
 
ईटानगर : अरुणाचल प्रदेशात धर्मांतर कायद्याविरोधात (Anti-Conversion Law) आता ख्रिश्चन धर्मियांनी ६ मार्च रोजी ईटानगरमधील बोरम मैदानावर निदर्शने दर्शवली आहेत. त्यांनी अरुणाचल प्रदेशातील धर्म स्वातंत्र्य अधिनियम १९७८ ला संबंधित कायदा हा क्रूरपद्धतीचा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी दावा केला की, ख्रिश्चन समुदायाला टार्गेट करण्यात आले. त्यांनी असा दावा केला की, चीनच्या सीमेला लागून असलेल्या राज्यात हिंसाचाराचे अधिक प्रमाण वाढले आहे.
 
अरुणाचल ख्रिश्चन फोरमचे अध्यक्ष तारह मिरी यांनी सांगितले की, हे संविधानाविरोधात आहे. राज्यात ख्रिश्चन धर्माला लक्ष्य करण्यात आले आहे. याच परिस्थितीला घेऊन राज्याचे गृहमंत्री मामा नटुंग यांच्यासोबत बैठक झाली. मात्र संबंधित बैठकीतून काहीही निष्फळ झालेले नाही.
 
अशातच सूर्य आणि चंद्राची पूजा उपासना करणाऱ्या देशी जोनी पोलो धर्माच्या अनुयायांनी कायद्याचे समर्थन केले आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू या कायद्यात बचाव करत कोणत्याही धर्माला हानी पोहोचणार नसल्याचे सांगण्यात आले. ते म्हणाले की, १९७८ मध्ये स्थानिक धर्मियांनी धर्मांतरापासून संरक्षण करण्यासाठी याची अंमलबजावणी करण्यात आली. राज्याचा सांस्कृतिक वारसा जतन करणे हा या कायद्याचा उद्देश असल्याचे म्हटले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0