आधी अजान कोणाची? वादाचे रुपांतर तुफान हाणामारीत

06 Mar 2025 17:55:21

two groups of muslims clash in ahmedabad

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (muslims clash in ahmedabad) 
गुजरातच्या अहमदाबाद येथे रमजानच्या महिन्यात दोन गटांत तुफान राडा झाल्याचे एका व्हिडिओतून निदर्शनास आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुस्लिमांच्याच दोन गटांत वाद झाला असून पुढे वादाचे रुपांतर दगडफेकीत झाल्याचे पाहायला मिळाले. अजान देण्यावरून सदर परिस्थिती उद्भवल्याचे स्पष्ट होत आहे. यावेळी अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. हे प्रकरण मुस्लिमांच्या दोन पंथांशी संबंधित असून भांडणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचलंत का? : मतांची भूक सिद्धरामय्या सरकारला आवरे ना; कर्नाटकात मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण


मिळालेल्या माहितीनुसार सदर व्हिडिओ कर्णावती येथील असल्याचे सांगण्यात येत आले. दि. २ मार्च रोजी 'आधी अजान कोण देणार' या मुद्द्यावरून अहमदिया आणि बिस्मिल्ला मस्जिदमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर मुस्लीम समाजातील अल अदिस आणि शिया या दोन जमाती समोरासमोर आल्या आणि दोघांमध्ये भांडण सुरू झाले. त्यानंतर मात्र दोन्ही गटांमध्ये एक करार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेषतः रमजान महिन्यात हे प्रकरण झाल्याने विषयाची चर्चा होते आहे.

Powered By Sangraha 9.0